समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा अपघातामधील १२ मृतकांची अेाळख पटली
By निलेश जोशी | Updated: July 1, 2023 12:43 IST2023-07-01T12:43:19+5:302023-07-01T12:43:38+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिकस्तरावर ही माहिती देण्यात आलेली आहे.

समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा अपघातामधील १२ मृतकांची अेाळख पटली
बुलढाणा: सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावानजीक खासगी प्रवाशी बसला झालेल्या अपघातामधील २५ पैकी १२ मृतकांची अेाळख पटली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिकस्तरावर ही माहिती देण्यात आलेली आहे.अेाळख पटलेल्या मृतकांची नावे खालील प्रमाणे
१) आयुष गाडगे (नागपूर)
२) कौस्तूभ काळे (नागपूर)
३) कैलास गंगावणे (नागपूर)
४) इशांत गुप्ता (नागपूर)
५) गुडीया शेख (नागपूर)
६) अवंती पोहनकर (वर्धा)
७) संजीवनी गोटे ( अल्लीपूर, वर्धा)
८) प्रथमेश खोडे (वर्धा)
९) श्रेया वंजारी ( वर्धा)
१०) वृशाली बनकर (वर्धा)
११) अेाबी नबकर ( वर्धा)
१२) शोभा बनकर (वर्धा)
अपघातामधील जखमी
१) शेख दानिश शेख इस्माईल (रा. दारव्हा, यवतमाळ)
२) संदीप मारोती राठोड (रा. तिवसा, जि. अमरावती)
३) यागेश रामराव गवई (रा. संभाजीनगर)
४) साईनाथ धरमसिंग पवार (रा. माहुर)
५) शशिकांत रामकृष्ण गजभिये (रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ)
६) पंकज रमेशचंद्र (रा. कांगडा जिल्हा, हिमाचल प्रदेश)
जखमींच्या नावापैकी शेख दानिश व संदीप राठोड हे दोघे अपघातग्रस्त वाहनाचे चालक व क्लिनर आहेत. उर्वरित जखमींवर देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.