शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून शिक्षक मिळेना

By admin | Updated: February 19, 2015 00:25 IST

उर्दू शाळेचा भार एकाच शिक्षकावर; चिखली पंचायत समितीत भरविली शाळा.

चिखली (जि. बुलडाणा) : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शाळांची गुणवत्ता वाढून पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे दोन वर्षापासून शाळेला शिक्षक मिळत नाही म्हणून आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थी व पालकांवर ओढावल्याने इसोली येथील जि.प. उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी १८ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच शाळा भरवून शिक्षकाची मागणी केली.तालुक्यातील इसोली येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या इयत्ता १ ते ५ पर्यंतच्या प्राथमिक शाळेत आजरोजी २२ मुले व ४0 मुली असे एकूण ६२ विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची ३ पदे मंजुर आहेत. मात्र, सन २0१२ पासून यातील १ पद रिक्त असल्याने गत दोन वर्षांपासून १ ते ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोन शिक्षकांवर आहे. असे असताना या दोन शिक्षकांपैकी नईमउल्ला नजरउल्ला या शिक्षकाची किन्होळा येथे तात्पुरती व्यवस्था म्हणून नियुक्ती केल्याने इसोली येथील शाळेतील १ ते ५ पर्यंतच्या मुलांना केवळ एकच शिक्षक उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबीने संतप्त पालक व शाळा समितीच्या पदाधिकार्‍यांनी १८ फेब्रुवारी रोजी उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समितीचे कार्यालय गाठून शिक्षकाची मागणी केली. दरम्यान गटशिक्षणाधिकार्‍यांनी ग्रामस्थांचे गर्‍हाणे ऐकूण तातडीने कारवाई करून शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत लेखी अश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.