पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 22:36 IST2019-08-13T22:36:26+5:302019-08-13T22:36:32+5:30
कर्जबाजारीपणामुळे पहूरजिरा येथील पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
जलंब : कर्जबाजारीपणामुळे पहूरजिरा येथील पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
दिनकर नामदेव सुडोकार (वय ५५) व रुखमाबाई दिनकर सुडोकार (४५) हे दोघे घरात गळफास घेतलेल्या स्थितीत मंगळवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास दिसून आले. त्यांचा १ मुलगा काही दिवसापूर्वीच मृत्युमुखी पडला आहे. तर मुलीचे लग्न झाले आहे. त्यांच्याकडे १ एक्कर शेती होती. ब-याच दिवसापासून ते विवंचनेत असल्याचे गावक-यांनी सांगितले. याप्रकरणी जलंब पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.