शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविताना पतीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:39 PM

Buldhana News पाणी काढताना अर्चना ऊर्फ आरती पाय घसरून विहिरीत पडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १ आॅक्टोबरच्या दुपारी तालुक्यातील येवता शिवारात घडली. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेले नवदाम्पत्य सोनेवाडी येथील असून तरूण दाम्पत्याचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने सोनेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.तालुक्यातील सोनेवाडी येथील शांताराम देवराम राखुंडे (वय २३) व त्यांची पत्नी अर्चना ऊर्फ आरती शांताराम राखुंडे हे दाम्पत्य १ आॅक्टोबर रोजी येवता शिवारातील एका शेतात सोयाबीन सोंगणीसाठी गेले होते. सोयाबीन सोंगणीसाठी १२ जणांचा समुहात ते भल्या पहाटेपासून सोयाबीनची सोंगणी करीत होते. दुपारी जेवणानंतर शेताजवळील एका विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणावयास हे दाम्पत्य गेले होते. विहिरीतून पाणी काढताना अर्चना ऊर्फ आरती यांचा पाय घसरून विहिरीत पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी शांताराम यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकरी व पोलिसांनी धाव घेऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढले.मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या या नवदाम्पत्याचा लॉकडाऊन काळात साध्या पध्दतीने विवाह झाला होता. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसआय बालुसिंग राजपूत, पोलीस काँस्टेबल उमेश राजपूत करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात