शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

मानवता ही जात आणि धर्माच्या पलिकडे - प्रा. शमसुद्दीन तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 3:22 PM

संविधान हा धर्म ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नसावी, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

खामगाव : शांतता, अंहिसा आणि मानवता ही त्रिसुत्रीच प्रत्येक धमार्ची शिकवण आहे. मात्र, दोन्ही कडील काही आडमुठ्या तत्वांमुळेच समाजातील शांतता भंग पावत आहे. मानवता ही जात आणि धर्माच्या पलिकडे असून, संविधान हा धर्म ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नसावी, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्याशी साधलेला संवाद...

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या प्रमुख उद्देशाबाबत काय सांगाल? भारतीय संविधान आणि संविधानातील सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वता या मानवी मुल्याची जपणूक करणे हाच मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम महिला आणि युवकांना संविधानात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी या मंडळाचे प्रामाणिक प्रयत्न आहेत.

बकरी ईद निमित्त  रक्तदान शिबिरा मागील संकल्पना काय?  - कुर्बानीचा अर्थ अधिक समाजाभिमुख व्हावा, त्याग करण्याची मानसिकता वाढावी व सामाजिक सद्भाव वाढावा म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्यावतीने  रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. 

कधीपासून हे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते?- गत दहा वर्षापासून बकरी ईद निमित्त   १२ ते १९ आॅगस्टच्या दरम्यान  रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. पूर्वी बकरी ईदच्या दिवशी हे रक्तदान शिबिर आयोजित केले जायचे. मात्र, राज्यभरातून मिळणाºया उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता या उपक्रमाला सप्ताहाचे स्वरूप प्राप्त होत आहे. पुणे, औरंगाबाद, सांगली, सातारा आणि नागपूर येथील मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून हा उप्रकम आयोजित केला जातो.  यावर्षी मंडळाने ५१ हजार रूपयांचा निधी नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून दिला. बकरी ईदची कुर्बानी टाळून मंडळाने घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. प्रत्येक धर्म शांतता, अंहिसा आणि मानवतावादी आहे. परंतु असे असतानाही हिंसा, अत्याचार आणि शांतता भंगाचे प्रकार वाढीस लागले आहे. या प्रकाराच्या समूळ उच्चाटनासाठी सैध्दांतिक आणि व्यवहारातील धर्मामध्ये ‘समन्वय’ गरजेचा आहे. संविधानाला अभिप्रेत  असणाºया समाज निर्मितीसाठी मुस्लिम  मंडळाचा लढा आहे.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कधी झाली?माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी कुठलाही धर्म-रूढी-परंपरा अडसर ठरता कामा नये. देश धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र व्हावे या उद्दात्त हेतूने थोर विचारवंत हमीद दलवाई यांनी २२ मार्च १९७० रोजी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना केली. तत्पूर्वी ‘समान नागरी कायद्यासाठी’ हमीद दलवाई यांनी १९६६ मध्ये विधासभेवर तलका पीडित महिलांचा मोर्चा काढला होता. गत चार दशकात मंडळाने विविध समाजपयोगी उपक्रम राबविले असून आता या मंडळाची सुवर्ण महोत्सवी वर्षांकडे वाटचाल सुरू आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत