धामणदरीत शॉर्टसर्कीटमुळे घराला आग; तीन लाखांचे नुकसान

By निलेश जोशी | Updated: October 12, 2023 14:53 IST2023-10-12T14:52:48+5:302023-10-12T14:53:15+5:30

श्याम नगरमधील योगेश नामदेव शेळके यांच्या घराला ही आग लागली.

House fire due to short circuit in Dhamandari, loss of three lakhs in buldhana | धामणदरीत शॉर्टसर्कीटमुळे घराला आग; तीन लाखांचे नुकसान

धामणदरीत शॉर्टसर्कीटमुळे घराला आग; तीन लाखांचे नुकसान

बुलढाणा: शहरानजीक असलेल्या सागवन परिसरातील धामनदरी असलेल्या श्यामनगर भागात एका घराला आग लागून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

श्याम नगरमधील योगेश नामदेव शेळके यांच्या घराला ही आग लागली. आगीचा लोळ व धुर पाहून जवळचे नागरिक मदतीसाठी धावले दरम्यान पालिकेच्या अग्नीश्यामक दालनेही वेळीच घटनास्थळ गाठून आग विझविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. अग्निश्यामक दलाचे गजानन गाेरे, अब्दूल रियाज, गजानन काळे चालक अनुप खरे, वैभव जाधव, करण बेंडवाल, अभिषेक वाघ व स्थानिक नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याासठी शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत चार दुचाकी, घरातील अन्नधान्य, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, टीव्ही, फ्रिज तसेच इतर संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. जवळपास तीन लाख रुपयापर्यंत येथे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला व सोबतच अन्य मदत केल्याचे सुत्रांनी सांगितले.

Web Title: House fire due to short circuit in Dhamandari, loss of three lakhs in buldhana