सिलिंडर पेटल्याने घराला आग; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:55 IST2020-10-31T12:55:31+5:302020-10-31T12:55:43+5:30

Khamgaon News घराला आग लागून चौघे जण भाजल्याने जखमी झाले. 

The house caught fire as the cylinder ignited; Four injured | सिलिंडर पेटल्याने घराला आग; चार जखमी

सिलिंडर पेटल्याने घराला आग; चार जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : स्थानिक मस्तान चौक भागातील पोलीस चौकीजवळील एका घरात अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतल्यामुळे घराला आग लागून चौघे जण भाजल्याची घटना शुक्रवारी  सकाळी घडली.
मस्तान चौक भागातील फाटकपुरामधील रहिवासी शे. अहमद शे. बुन्हाण (७०) यांच्या घरात  सकाळी १० वाजता अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला. त्यामुळे स्वयंपाक घरात आग लागल्याने  आगीत घरामधील शे. अहमद शे. बुऱ्हाण, मो.तौफीक मो.रफीक, मो. शफी शे. अहमद (४०) व रूबिना अंजुम मो. शफी हे चौघे जण भाजल्याने जखमी झाले. 
घरात आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी व मस्तान चौक पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी घराकडे धाव घेऊन तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
घटनेची माहिती मिळताच न.प. अग्निशामक दलानेही घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये घरातील वस्तू आणि इलेक्ट्रीक वायरिंग जळून खाक झाले. यातील शे. अहमद शे. बुऱ्हाण व मो. तौफीक मो. शफी हे दोघे ३५ते ४० टक्के  भाजल्याने त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

Web Title: The house caught fire as the cylinder ignited; Four injured