शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हमीदर केंद्रावर दोन लाख क्ंिवटल तूर पडून!

By admin | Updated: April 25, 2017 00:39 IST

सोमवारीही वजनकाटे राहिले बंद : मुदतीत आलेल्या तुरीच्या मोजमापाची प्रतीक्षा

गिरीश राऊत - खामगावकधी नव्हे ती विक्रमी तूर खरेदी करणाऱ्या जिल्ह्यातील हमीदराने तूर खरेदी केंद्र आवकसाठी बंदच झाली आहे, तर दिलेल्या मुदतीत या केंद्रावर आलेली १ लाख ९० हजार ४५६ क्ंिवटल तूर पडून आहे. रविवारी मोजमापाला सुटी राहत असल्याने सोमवारी मोजमाप सुरू होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र आदेश नसल्याचे कारणावरून मोजमाप दुसरे दिवशीसुद्धा बंदच राहिले. एकूणच अनेक दिवसांपासून या केंद्रावर तूर विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपली तूर खरेदी केली जाईल किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गतवर्षी ११ हजार रुपयांपर्यंत भाव पोहोचलेल्या तुरीचे उत्पादन घेऊन उत्पन्न मिळविण्याचे आशेने यावर्षी शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा केला होता. सुदैवाने तूर पिकाला निसर्गाची सुद्धा साथ मिळाल्याने यावर्षी जिल्ह्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र नेहमी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची यावर्षीही तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असताना भाव पडल्याने कोंडी झाली. सुरुवातीपासून तर आतापर्यंतही तुरीचे भाव शासनाच्या तुरीला असणाऱ्या हमीदराच्या आसपासही नसल्याने कधी नव्हे, अशी साडेचार लाख क्ंिवटल तूर खरेदी यावर्षी केवळ बुलडाणा जिल्ह्यातील केंद्रांवर करण्यात आली. महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (नाफेड), विदर्भ मार्केटिंग को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (व्हीसीएमएम), भारतीय खाद्य निगम (एफसीआय) मार्फत करण्यात आली. मात्र, कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी न केल्याने वा पूर्वनियोजन न झाल्याने तूर खरेदी सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक केंद्र बारदान्याचा अभावामुळे बंद होती. मोठ्या प्रमाणात तुरीचे मोजमाप राहिल्याने १५ एप्रिल त्यानंतर २२ एप्रिल, अशी दोनवेळा मुदतवाढ सुध्दा देण्यात आली. मात्र २२ एप्रिल रोजी आवक बंद केल्यानंतरही २२ एप्रिलआधी या केंद्रावर आलेल्या तुरीचे मोजमाप या तारखेपर्यंत होऊ शकले नाही. त्यामुळे आजरोजी जिल्ह्यातील नाफेडच्या ७ केंद्रांवर १ लाख १२ हजार ६५० क्ंिवटल तूर मोजमापाअभावी पडून आहे. २२ एप्रिलपर्यंत मोजमाप झाल्यानंतर २३ एप्रिल रोजी रविवार असल्याने तुरीचे मोजमाप बंद होते. मात्र, आज सोमवारी सुद्धा तुरीचे मोजमाप करण्यात आले नाही. त्यामुळे केंद्र सुरु असताना विक्रीसाठी आणलेल्या तुरीचे मोजमाप न झाल्याने आपल्या तुरीचे मोजमाप होईल की नाही, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. एकूणच मुदतीत या केंद्रांवर आणलेली तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा झाला खर्च या केंद्रावर तूर विक्रीस आणताना शेतकऱ्यांना वाहतूक खर्च करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी मालाची नासाडी होईल म्हणून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तुरीचे पोते ठेवलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना ट्रॉली भाड्याचा खर्च करावा लागत आहे. तसेच बरेच शेतकऱ्यांनी तूर विक्रीस आणल्यानंतर त्यांना ८ ते १० दिवसांपासून केंद्रावर मुक्काम ठोकावा लागला. यामुळे घरी ये-जा करणे व रात्रीची राखणदारी याचाही खर्च करावा लागला आहे. मात्र खर्च झाल्यानंतर तुरीची हमीदराने खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांची अवस्था ‘सौ के साठ’ अशीच होणार आहे.--