वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:04 IST2017-10-31T01:04:19+5:302017-10-31T01:04:31+5:30

सोनाळा: येथील वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यावर वीज ग्राहकाने मारहाण केल्याची घटना सोमवार ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. 

Hit the Junior Engineer of Electricity Distribution | वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण 

वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण 

ठळक मुद्देसोनाळा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता श्रीराम बोदडे यांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनाळा: येथील वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यावर वीज ग्राहकाने मारहाण केल्याची घटना सोमवार ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. 
सोनाळा येथील ३३ केव्ही वीज वितरण उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता श्रीराम बोदडे हे कार्यालयात काम करीत असताना दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास  वीज ग्राहक संदीप सेवकराम गावंडे रा. सोनाजी नगर सोनाळा हा तेथे आला व त्याने माझे वीज बिल कमी करून देता की नाही, असे म्हणून बोदडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना मारण्यासाठी लोखंडी रॉड घेऊन अंगावर धावून गेला. यावेळी उपस्थित कर्मचारी व वीज ग्राहकांनी त्याला आवरल्याने पुढील अनर्थ टळला; मात्र टेबलवरील काचांची तुटफूट झाली. मिळालेल्या माहितीनुसार संदीप गावंडे याच्याकडे वीज बिल थकल्याने व वारंवार त्याला सूचना देऊनही त्याने बिलाचा भरणा न केल्याने त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे चिडून जाऊन त्याने हल्ला केल्याचे समजते. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता बोदडे यांनी सोनाळा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. 

Web Title: Hit the Junior Engineer of Electricity Distribution