शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर

By admin | Updated: April 7, 2015 01:56 IST

रिक्त पदांची घरघर; वैद्यकीय अधिका-यांची ८३ पदे रिक्त.

सिद्धार्थ आराख/बुलडाणा : कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांची घरघर लागल्याने आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे चित्र सर्वत्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह १२ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची तब्बल ८५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधीनस्त वैद्यकीय अधिकारी गट-अ वर्ग-१ ची मंजूर ४९ पदां पैकी केवळ १३ पदे भरलेली असून, ३६ पदे रिक्त आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील १६, खामगाव उपजिल्हा रुग्णालयातील १0, सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथील १ आणि मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील १ असे २८ पदांचा समावेश आहे. तर बीबी, देऊळगावमही, चिखली, लाखनवाडा, वरवट बकाल, सिंदखेडराजा, मोताळा, धाड, मेहकर, लोणार, देऊळगावराजा आणि जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येकी १ अशा ८ वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. याशिवाय जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रमीण व सामान्य रुग्णालयात गट-अ वर्ग-२ ची ११३ पदे मंजूर आहेत, पैकी ६८ पदे भरलेली असून, ४५ पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील ११ पदांचा समावेश असून, त्या पाठोपाठ खामगाव, शेगाव आणि मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी गट-ब वर्ग -३ ची जिल्ह्यात १0 पदे मंजूर आहेत यापैकी केवळ ६ पदे भरण्यात आली आहेत. यातील ४ पदे रिक्त आहेत. यामध्ये खामगाव, मलकापूर, मेहकर, शेगाव, देऊळगावराजा, येथील नगरपालिकेच्या रुग्णालया तील वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे तर, जिल्हा कारागृह आणि क्षय आरोग्य धाम येथील रुग्णालयातसुद्धा रिक्त पदांचा अनुशेष आहे. या रिक्त पदांमुळे रुग्णालयात सुविधा असताना त्यापासून रुग्णांना वंचित राहावे लागत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.