हनुमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता, वान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 15:48 IST2022-07-18T15:48:12+5:302022-07-18T15:48:51+5:30
संध्याकाळ पर्यंत जलसाठ्यात वाढ होणार असल्याने वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा निश्चित केला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत धरणाची दरवाजे उघडली जाणार आहेत.

हनुमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता, वान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
संग्रामपूर (बुलडाणा) : वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणाचे दरवाजे सोमवारी संध्याकाळ किंवा रात्री उशिरापर्यंत उघण्याची शक्यता आहे. पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी दुपारपर्यंत धरणात ६२ टक्के जलसाठा झाला आहे. संध्याकाळ पर्यंत जलसाठ्यात वाढ होणार असल्याने वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा निश्चित केला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत धरणाची दरवाजे उघडली जाणार आहेत.
रविवारी धरण पाणलोट क्षेत्रात ४७ मिमि पावसाची नोंद झाली असून सोमवारी दिवसभरापासून कोसळधार सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येत्या काही तासात धरणाचे दरवाजे उघडून वान नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मंजूर जलाशय परिचालन सूचीनुसार धरणात जलसाठा वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत हनूमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे. त्या पृष्ठभूमीवर वान नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा वान प्रकल्प पूर्ण नियंत्रण कक्षा कडून देण्यात आला आहे.