शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

Gram Panchayat Election : सरपंच आरक्षण साेडतीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 11:28 AM

Gram Panchayat Election : जिल्हा प्रशासनाने आधी जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. त्याचा निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर झाला असून, आता सरपंच काेण हाेणार, याविषयी गावागावात चर्चेचे फड रंगत आहेत. जिल्हा प्रशासनाने आधी जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. आता येत्या २७ जानेवारी राेजी तहसीलस्तरावर व २९ जानेवारी जिल्हास्तरावर महिला आरक्षण साेडत निघण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचातींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यापैकी २८ ग्रामपंचायती अविराेध झाल्याने ४९८ ग्रामंपचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. या मतदानाचा निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पॅनल विजयी झाले आहेत, तर बहुतांश ठिकाणी सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. मेहकर तालुक्यातील डाेणगाव येथे अपक्षांच्या हाती सत्तेची चावी आहे. महाआघाडी सरकारने सरपंच पदाची थेट निवड रद्द केल्याने ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा महत्व आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत युवकही उत्साहाने सहभागी झाले आहेत. अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सरपंच साेडतीकडे लागले आहे. सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण हे तालुकास्तरावर, तर महिला आरक्षण जिल्हास्तरावर काढण्यात येणार आहे. आरक्षण साेडतीनंतर सरपंचपद निवडीसाठी घडामाेडींना वेग येणार आहे. जिल्हा प्रशासनाने २७ जानेवारी राेजी तहसीलस्तरावर आणि २९ जानेवारी राेजी जिल्हास्तरावर महिला आरक्षण साेडत काढण्याचे नियाेजन केल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाने आरक्षण साेडतीची अधिकृत तारखेची घाेषणा केलेली नाही. जिल्हाभरातील ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे लक्ष आता सरपंच आरक्षण साेडतीवर लागले आहे. 

सरपंचपदही हाेईल का अविराेध जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची अविराेध निवड झाली आहे. यामध्ये खूपगाव, पळसखेड भट, सिंदखेड, चांधई, मालगणी, अंचरवाडी, खाेर व मलगी, पिंपळगाव बु., पाडळी शिंदे, नागणगाव, काेटी, हिवरागडलिंग, आंबेवाडी, कंडारी, माेहना खु., लावणा, पिंप्री काेरडे, पळशी खु., मांडका, टाकळी, काळेगाव, मानेगाव, कुंड बु., शेंबा खुर्द, पिपंळखुटा खुर्द, वसाडी खुर्द, काेल्ही गवळी, टाकळी घडेकर आदींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सरंपचांची निवडही अविराेध हाेणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकbuldhanaबुलडाणा