शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई!

By admin | Updated: April 24, 2017 00:22 IST

शहरात येणाऱ्या नागरिकांना भागवावी लागते पाणपोईवर तहान

खामगाव : तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची शासकीय कामकाजानिमित्ताने शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी असते. मात्र, तालुक्याचे काम पाहणाऱ्या तालुकास्तरीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई भासत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी थंड पाण्याची सुविधा आहे. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांना भर उन्हात पाणी पिण्यासाठी हॉटेल वा इतर ठिकाणाचा शोध घ्यावा लागतो. किंवा विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.खामगाव शहर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे लोकसंख्येचे तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे. मात्र, शहरातील शासकीय कार्यालये शहरभर विखुरल्याने नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे शहरात भव्य अशा प्रशासकीय इमारतीचे निर्माण करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये अनेक शासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, याठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा अद्याप निर्माण करण्यात आलेली नाही. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडता येत नसल्याने त्यांच्यासाठी आरओ थंड पाणी बोलावून त्यांनी त्यांची पाण्याची गरज भागविली आहे. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे नागरिकांना या कार्यालयाबाहेर असलेल्या हॉटेलवर चहा, नाश्ता घेऊन पाणी मिळवावे लागते किंवा पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीतून मुद्रांक नोंदणी विभागाचा अपवाद वगळता, तर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा अन्य कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये दिसून येत नाही. पोलीस स्टेशन आवारातील टाकीतही ठणठणाट!शहरातील शहर पोलीस स्टेशन हे रहदारीच्या रस्त्यावर आहे. तसेच दरवर्षीच उन्हाळा खामगावकरांसाठी तापदायक ठरत असतो. शहरातील तापमान वाढते राहते असल्याने पाणी पिण्याची सुविधा व्हावी, यासाठी शहर पोलीस स्टेशनसमोर अद्ययावत पाणपोई उभारण्यात आली आहे. मात्र आजरोजी या पाण्याच्या टाकीतही ठणठणाट आहे. त्यामुळे झालेला खर्च व्यर्थ ठरत असून, आशेने पाणी पिण्यासाठी आलेला इसम नळाची तोटी फिरविल्यानंतर पाणी नसल्याचे समजून तसाच चालता होतो.