शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

शासकीय धान्य वाहतूक करणारे वाहन 'आरटीओ'ने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:26 PM

शासकिय गोदामातून धान्य घेऊन निघालेल्या एमएच- ३१ -एपी- ३३५३ क्रमांकाच्या वाहनाची खिळखिळी अवस्था बघून मोटार वाहन निरीक्षकांनी वाहनाची तपासणी केली.

बुलडाणा : स्वस्त धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता चालकाकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने मोटार वाहन निरीक्षकांनी ९ जुलै रोजी चालकास मेमो दिला असून बुधवारी त्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.जिल्ह्यातील शासकिय धान्य वाहतूकीचा ठेका अमरावती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीने घेतलेला आहे. खामगाव येथील एफसीआयच्या गोदामातून जिल्ह्यातील १६ गोदामामापर्यंत व गोदामातून सर्व रेशन दुकानदारांना द्वार पोहोच योजनेंतर्गत माल पोहोचविण्याची जबाबदारी याच संस्थेची आहे. ठेकेदारास शासन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक एफ. एस. शेख, चालक जाधव सकाळी गस्तीवर होते. शासकिय गोदामातून धान्य घेऊन निघालेल्या एमएच- ३१ -एपी- ३३५३ क्रमांकाच्या वाहनाची खिळखिळी अवस्था बघून मोटार वाहन निरीक्षकांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी चालक समीर शेख याच्याकडे वाहन परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, टॅक्स, पीयुसी आदी कागदपत्रे आढळली नाही. त्यामुळे मोटार वाहन निरीक्षकांनी चालकास मेमो देऊन बुधवारी कागदपत्रांसह आरटीओ कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. यापूर्वीही श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीच्या एका वाहनास आरटीओने खामगाव येथे पकडले होते. 

शासकिय धान्याची वाहतूक करणाºया वाहन चालकाकडे वाहन परवाना, योग्यता प्रमापत्र, कर भरणा पावती, पीयुसी आदी कागदपत्रे आढळली नाही. त्यामुळे त्यास मेमो दिला असून बुधवारी आरटीओ कार्यालयात बोलावले आहे. कागदपत्रांची तपासणी करुन कारवाई करण्यात येईल.- एफ.एस.शेखमोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRto officeआरटीओ ऑफीस