शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

घरोघरी होणार आगमण गौरींचे;आभूषणासह सजावट साहित्याने फुुलला बाजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 5:49 PM

बुलडाणा: गणरायाची गुरूवारी स्थापना झाल्यानंतर तिसºया दिवशी गौरींचे लक्ष्मीच्या पावलाने माहेरी आगमण होते.

ठळक मुद्दे जिल्ह्यात घरोघरी गौरींची अर्थात महालक्ष्मींची स्थापना शनिवारला करण्यात येणार आहे. महालक्ष्मीच्या साजाने जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील बाजार सजला आहे. वेगवेगळ्या आभूषणासहित पदार्थ व सजावट साहित्याने बाजार फुलल्याचे दिसून येते.  

बुलडाणा: गणरायाची गुरूवारी स्थापना झाल्यानंतर तिसºया दिवशी गौरींचे लक्ष्मीच्या पावलाने माहेरी आगमण होते. गौरींच्या स्वागतासाठी माहिलांनी तयारी केली असून जिल्ह्यात घरोघरी गौरींची अर्थात महालक्ष्मींची स्थापना शनिवारला करण्यात येणार आहे. महालक्ष्मीच्या साजाने जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील बाजार सजला आहे. वेगवेगळ्या आभूषणासहित पदार्थ व सजावट साहित्याने बाजार फुलल्याचे दिसून येते.       शनिवारपासून तीन दिवस गौराईचा उत्सव चालणार असून त्यासाठी बुलडाणा येथील बाजारपेठही महालक्ष्मीच्या साजाने सजली आहे. शनिवारला गौरी आवाहन म्हणजे गौरीची स्थापना, रविवारला गौरी पूजन व सोमवारला गौरी विसर्जन केले जाणार आहे. या तीन दिवसांच्या उत्सवासाठी सध्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या वस्तू आल्या आहेत. घराघरात मखर तयार झाले आहेत.  काही ठिकाणी मुखवटे व संपूर्ण मुर्तीही तयार केली जाते. मात्र सर्वाधीक मागणी ही मुखवट्यांनाच आहे. महालक्ष्मीचा साज खरेदी करण्यासाठी बाजारपेठेतही गर्दी उसळली आहे. घराघरात महालक्ष्मींच्या स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. मुखवट्यांची सजावट आणि नवीन मुखवटे खरेदीसाठी मूर्तिकारांकडेही गर्दी दिसून येत आहे. हा उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक पिढीत महालक्ष्मींना स्थापना करण्याची वैविध्यता बदलत गेली आहे. एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हा उत्सव प्रत्येक घरात परंपरेने पुढे सरकतो; मात्र साधने नवीन असली तरी आस्था व श्रद्धा तितकीच कायम असल्याचे दिसून येते. महालक्ष्मींच्या जेवणाचा दिवस हा घराघरातील आनंद, उत्साह व मांगल्याचा दिवस असतो, जवळपास विविध प्रकारच्या भाज्या, मिष्टान्नांचा नैवद्य तयार केला जातो. प्रसाद घेण्यासाठीची आमंत्रणे कितीही असली तरी प्रत्येक जण आमंत्रण स्वीकारून महालक्ष्मींच्या दर्शनासाठी तरी हजेरी लावतोच एवढे महत्व महालक्ष्मी अर्थात गौराईच्या सणाला आहे. गौरार्इंचा आगमणाचा हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा बुलडाणा जिल्ह्यात जोपासली जाते.  पारंपारिक मुखवट्यांनाच मानतांबे, पितळ आणि पंचधातूच्या मुखवट्यांपेक्षा मातीच्या मुखवट्यांनाच मागणी असते. बाजारामध्ये आकर्षक असे मुखवटे विक्रीस आले असून पारंपरिक मुखवट्यांना अधिक मान मिळत आहे. मुखवटे, साड्या, दागिने, हार, मांडव, पडदे, मखर अशा सर्व प्रकारचे साहित्य सध्या बाजारात उपलब्ध आहे. 

रेडिमेड मखर संपूर्णपणे रेडिमेड मखर बाजारात उपलब्ध असल्याने असे मखर घेण्याकडे महिलांचा कल दिसून येत आहे. साड्या अथवा मलमली पडद्याचे मांडव करत महिला आपल्या गौरींचे देखण्या मांडवात स्थापना करत. मात्र आता रेडिमेड मखर आल्याने त्याची मागणी वाढली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndian Festivalsभारतीय सणIndian Traditionsभारतीय परंपरा