Ganpati immersion rally : stone pelting on Sindhi navyuvak Ganesh Mandal | खामगाव: गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमधील किरकोळ वादातून हाणामारी

खामगाव: गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमधील किरकोळ वादातून हाणामारी

खामगाव - खामगाव शहरामध्ये अत्यंत उत्साहात व आनंदाच्या वातावरणात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी संध्याकाळी किरकोळ हानामारीचा प्रकार घडला. सिंधी नवयुवक गणेशोत्सव मंडळ व जय बजरंग गणेशोत्सव मंडळात किरकोळ वाद झाला. यावरून  दोन्ही मंडळाच्या काही कार्यकर्तेमध्ये बााचाबाची झाली. काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. याशिवाय डीजेच्या गाडीच्या काच सुद्धा फोडण्यात आला. यामध्ये काही युवक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांच्या मध्यस्थी नंतर मिरवणूक पुुन्हा शांततेेेत सुरू आहे. गांधी चौकजवळ मेनरोड वर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.  घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. 

Web Title: Ganpati immersion rally : stone pelting on Sindhi navyuvak Ganesh Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.