सुलतानपूर येथील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:57+5:302021-05-06T04:36:57+5:30

ते गुजरातमधील जामनगर येते कर्तव्यावर होते. तेथून त्यांचे युनिट एका प्रशिक्षणासाठी राजस्थानमधील बाडमेर येथे एका महिन्यापूर्वी गेले होते. तेथे ...

Funeral at Sultanpur in a state funeral | सुलतानपूर येथील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुलतानपूर येथील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next

ते गुजरातमधील जामनगर येते कर्तव्यावर होते. तेथून त्यांचे युनिट एका प्रशिक्षणासाठी राजस्थानमधील बाडमेर येथे एका महिन्यापूर्वी गेले होते. तेथे जवान पवन विष्णू रिंढे यांचे २ मे रोजी आकस्मिक निधन झाले होते. २०१६-१७ मध्ये ते सैन्यदलात भरती झाले होते. बेळगाव येथे त्यांनी त्यांचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले होते.

दरम्यान, ४ मे रोजी सायंकाळी त्यांचे पार्थिव सुलतानपूर येथे त्यांच्या मुळ गावी आणण्यात आले होते. मृत सैनिक पवन रिंढे यांच्या पार्थिवाचे त्यांच्या निवासस्थानासमोर नातेवाईक व ग्रामस्थांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक व ग्रामस्थांना शारीरिक अंतराचे पालन करत त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांचे पार्थिव मोजक्याच नातेवाईकांसह स्मशानभूमीत नेण्यात आले. येथे सर्वप्रथम लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. सोबतच सैन्यदलातील नाईक सुभेदार बळीराम खांडेभराड, संतोष लगड, हवालदार विनोद इंगळे, सैनिक ओमप्रकाश गाडेकर, गोपाल टकले व मेहकर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक जायभाये, विजयकुमार घुगे, सरपंच चंद्रकला अवचार, शांतीलाल जैन यांनीही त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी सैन्यदलातील जवानांनी सलामीही दिली. सोबत ‘पवन रिंढे अमर रहे।’च्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. यावेळी ग्राम विकास विकास अधिकारी संतोष क्षीरसागर, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर सानप, निवृत्ती सानप, उपसरपंच प्रदीप सुरूशे, तलाठी प्रमोद दांदडे यांच्यासह मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत कोराना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Funeral at Sultanpur in a state funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.