एसटी महामंडळाला माल वाहतुकीचा आधार; ३२ लाखांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 15:35 IST2020-10-21T15:35:36+5:302020-10-21T15:35:43+5:30
Freight transport to the ST Corporation मालवाहतुकोपोटी ३२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची भर पडली आहे.

एसटी महामंडळाला माल वाहतुकीचा आधार; ३२ लाखांची कमाई
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे अर्थचक्र बिघडले होते. संचारबंदीच्या काळात एसटीने मालवाहतूकीची सुविधा सुरू केल्याने बुलडाणा विभागाला पाच महिन्यात ३२ लाख ७१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशी वाहतूक बंद झाल्यानंतरच्या कठीण परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाला मालवाहतूकीचा आधार मिळाला आहे. सध्या ३० मालवाहू वाहने सुरू आहेत. व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आल्याने परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यबधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. एसटीपासून उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी एसटीतून मालवाहतूक करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. बुलडाणा जिल्ह्यात एसटी महांडळांच्या वतीने ३० मालवाहतुक बस सुरू केल्या आहेत.. यातून महामंडळाच्या
उत्पन्नाला बºयापैकी हातभार लागला आहे. २८ मे ते १२ आॅक्टोबरदरम्यान रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकोपोटी ३२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची भर पडली आहे. एसटी महामंडळाने अनलॉक प्रक्रीयेंतर्गंत पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू केली आहे. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रवाशांचा अद्याप प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. परिणामी, एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाना माल वाहतुकीच्या माध्यमातून आधार मिळत असल्याचे चित्र आहे.