शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चार विहिरी तरीही गाव तहानलेले!

By admin | Updated: April 24, 2017 00:17 IST

महिलांची पाण्यासाठी वणवण : महाजल योजनेचे फिल्टर प्लॅन्ट बंदच!

लक्ष्मीकांत जाधव - किनगावराजापिण्याच्या पाण्यासाठी २ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या महाजल योजनेचे पाणी गावात येण्याआधीच ही योजना भ्रष्टाचाराने बरबरटल्याने बंद पडली. सध्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत १५ हातपंप आणि चार विहिरी असूनही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोगणिक भटकंती करावी लागत असल्याने नागरिकामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. किनगावराजा गावाची लोकसंख्या ७ ते ८ हजार असून, येथील महिलांना आजही भर उन्हामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.येथील ग्रामपंचायत १३ सदस्यांची असून, या ग्रामपंचायतच्या हद्दीत एकूण १५ हातपंप आहेत. यापैकी चार हातपंप नादुरुस्त आहेत. येथील महाजल योजना ही जवळपास २ कोटीहून अधिक रुपये खर्च करून अद्यापसुद्धा बंद असल्यासारखीच आहे. सदर महाजन योजनेची पाइपलाइन ५ ते ६ किलोमीटरवरून आणलेली आहे. याकरिता राहेरी येथील पूर्णा नदीत दोन विहिरी असून, या विहिरीमधून किनगावराजा येथील पाताळगंगा नदीत पूरक विहीर खोदली असून, या विहिरीत पूर्णा नदीतून आणलेले पाणी सोडले आहे; परंतु या विहिरीवरील पाच हॉर्सपॉवरचा सब मर्सिबल पंप बऱ्याच दिवसांपासून बंदच आहे. महाजल योजनेचे फिल्टर प्लॅन्ट बंदच आहे. तसेच विहिरीवरील कडे अपूर्ण आहे. राहेरी येथून महाजलच्या टाकीपर्यंत आलेली पाइपलाइन सुरू केली असता ती हप्त्यातून ४ ते ५ दिवस लिकेज होत आहे. या पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. गावामध्ये जवळपास ३०० ते ४०० नळ कनेक्शन वैध असून, १५० चे वर नळ कनेक्शन अवैध आहेत. तरी भर उन्हात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हा त्रास थांबविण्यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.