खामगावातील चौघांचा राजस्थानमध्ये अपघात; सुदैवाने बचावले दुबे कुटुंब
By अनिल गवई | Updated: July 12, 2023 18:15 IST2023-07-12T18:15:13+5:302023-07-12T18:15:46+5:30
खामगाव येथील साईनगर येथे डॉ. अशोक दुबे राहतात. त्यांचा मुलगा इंदोर येथे नोकरी करतो

खामगावातील चौघांचा राजस्थानमध्ये अपघात; सुदैवाने बचावले दुबे कुटुंब
खामगाव : राजस्थानमध्ये रात्री झालेल्या खासगी बसच्या अपघातात खामगाव येथील दुबे परिवारातील चौघे थोडक्यात बचावल्याचे समोर येत आहे. देव तारी त्याला कोण मारी ह्या म्हणीची या घटनेत प्रचिती आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगाव येथील साईनगर येथे डॉ. अशोक दुबे राहतात. त्यांचा मुलगा इंदोर येथे नोकरी करतो. डॉ. दुबे हे आपल्या पत्नीसह काही दिवसांपूर्वी इंदोरला गेले होते. तेथून जयपूर-राजस्थानला देवदर्शनासाठी गेले. दरम्यान, राजस्थान येथून इंदोरला परतत असताना कोटा राजस्थान येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस वेगात उलटली. यामध्ये डॉ अशोक दुबे, त्यांच्या पत्नी साधना दुबे, मुलगा भावेंद्र दुबे, व सून नेहा दुबे सर्व सुदैवाने बचावले. ते सर्व किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच दुबे कुटुंबीयांशी आमदार ॲड. आकाश फुंडकरांनी फोनवरून संपर्क साधला व तब्येतीची विचारपूस केली.