तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार भाविकांचा मृत्यू; पाच जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 01:12 PM2021-10-26T13:12:58+5:302021-10-26T13:14:46+5:30

चिखली-खामगाव रस्त्यावरील मोहाडीनजीकची घटना

Four devotees died five injured in accident at chikhli khamgaon road | तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार भाविकांचा मृत्यू; पाच जखमी

तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार भाविकांचा मृत्यू; पाच जखमी

googlenewsNext

खामगाव: तीन वाहनांच्या विचित्र अपघातात अकोला येथील चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका दाम्पत्याचा समावेश असून ही घटना खामगाव-चिखली रोडवरील वैरागड घाटातील मोहाडी नजीक सकाळी १०:३० वाजता दरम्यान घडली. यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

अकोला येथील भाविक  एमएच ३० एए २२५५ क्रमांकाच्या प्रवासी जीपने पंढरपूरकडे जात होते. दरम्यान, मोहाडी नजीक एका मालवाहू वाहनाने सुरूवातीला महावितरण कंपनीच्या प्रवासी गाडीला धडक दिली. त्यानंतर मालवाहू जीप अकोला येथील प्रवाशांच्या वाहनावर येऊन धडकून झालेल्या विचित्र अपघातात पंढरपूर येथे जाणारे चार भाविक जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमी आणि मृतक सर्वजण अकोला येथील रहिवासी असल्याचे समजते. तर मालवाहू आणि महावितरणच्या वाहनातील प्रत्येकी एकजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. अपघातील किरकोळ जखमी परस्पर खासगी रूग्णालयात गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अपघातातील मृतांची नावे
श्यामसुंदर रोकडे (५५)- चालक
विश्वनाथ कराड (७२)
शंकुतला कराड  (६८)
बाळकृष्ण खर्चे   (७०)

अपघातातील जखमींची नावे
मुरलीधर रोहणकार
सुलोचना रोहणकार
उषा ठाकरे
श्यामराव ठाकरे
अलका खर्चे

अनेक हात धावले मदतीला...
अपघाताची माहिती मिळताच सुनिल लाहुडकर, संदीप गोंड, दत्ता काळुसे, संजय शर्मा यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावले. तत्पूर्वी धम्मपाल नीतनवरे, हर्षवर्धन खंडारे, सौरभ मोरे, वहीद जमाभाई, शंकर परदेशी यांनी अपघात ग्रस्तांना रूग्णालयात आणण्यासाठी मदत केली.

Web Title: Four devotees died five injured in accident at chikhli khamgaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.