करवंडमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालके जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:36 AM2021-02-10T11:36:31+5:302021-02-10T11:36:38+5:30

Dog Bite चारही मुलांना तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Four children injured in dog attack in Karwand | करवंडमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालके जखमी

करवंडमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालके जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावर खेळणाऱ्या चार बालकांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास करवंड येथे घडली. दरम्यान, जखमी मुलांवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. देऊळघाट येथेही ८ फेब्रुवारी रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्याने चार बालकांना जखमी केले होते. सलग दोन दिवसात दोन घटना घडल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.  गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वी सैलानी येथे एका आठ वर्षाचा मुलाचाही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर बुलडाणा शहरानजीकच्या सागवन येथेही एका बालकास कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले होते. दुसरीकडे देऊळघाट येथेही आठ फेब्रुवारी रोजी चार बालकांना पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून जखमी केले होते. त्यांच्यावरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 
या घटनेनंतर ९ फेब्रुवारी रोजी चिखली तालुक्यातील करवंड येथेही पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालके जखमी झाली आहेत. या घटनेत  करवंड येथील निशा सागर गवई  (५), शेख असद शेख अन्वर (९), पूर्वा सुनील फाटे (११), कार्तिक समाधान तारगे (६) ही बालके जखमी झाली आहेत. या चारही मुलांना तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करवंड गावातील नागरिकांनी या घटनेनंतर संतप्त होत पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारले.

Web Title: Four children injured in dog attack in Karwand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.