शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात चोरीची मोटर घेतल्याने भंगार विक्रेत्या माजी नगरसेवकाला कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 23:01 IST

शेगावातील घटना : अनेक घटनांचा तपास करण्याची मागणी

शेगाव (बुलडाणा) : विहिरीतील मोटरपंपांची चोरी करून ती शहरातील चोरट्यांनी भंगार व्यावसायिक काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख नईम शेख जमाल यांना विक्री केल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केली. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

शेगावातील फुलेनगर परिसरातील अतुल गोपाल कलोरे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीतील तीन अश्वशक्तीची विद्युत मोटर चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासात तीन पुतळा परिसर, नागझरी रोड या परिसरात राहणारे सुमित ऊर्फ आयकोन्या समदूर, शैलेंद्र सुरडकर यांना अटक केली. चौकशीमध्ये त्यांनी चोरीची मोटर शहरातील भंगार व्यावसायिक तथा काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख नईम शेख जमाल यांना विकल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी शेख नईम शेख जमाल (वय ३९, रा. अताऊल्ला चौक, शेगाव) याची विचारपूस केली. मोटर पोलिसांसमोर हजर केल्याने त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले असता, न्यायालयीन कोठडीमध्ये पाठविले. माजी नगरसेवकाविरोधात चोरीची मोटर घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात यापूर्वीही अनेक भंगार चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. त्याचाही पोलिसांनी आता तपास करण्याची गरज आहे. अधिक तपास गुन्हे शोध पथकाचे गणेश वाकेकर करीत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसThiefचोरbikeबाईक