Forget the mask in Dhamangaon Dhad area | धामणगाव धाड परिसरात मास्कचा विसर

धामणगाव धाड परिसरात मास्कचा विसर

जिल्हा प्रभारीपदी अमोल काकड यांची नियुक्ती

देऊळगावराजा: राष्ट्रीय समाज पक्षाच्या बुलडाणा जिल्हा प्रभारीपदी तालुक्यातील अमोल काकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी ही नियुक्ती केली आहे.

शहरअध्यक्षपदी साेहम झाल्टे यांची निवड

बुलडाणा : भारतीय जनता युवा माेर्चाचे गठण करण्याच्या उद्देशाने शहर अध्यक्षपदी साेहम झाल्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी शहर भाजप अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या हस्ते झाल्टे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

विश्वकर्मा जयंती साध्या पद्धतीने साजरी

किनगाव राजा : कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत येथे विश्वकर्मा यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्वप्रथम येथील नवनिर्वाचित सरपंच संजीवनी ज्ञानेश्वर कायंदे यांनी विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन केले.कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित हाेते.

दाऊदसेठ कुरेशी यांचा जिल्हा परिषदेमध्ये सत्कार

साखरखेर्डा : ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच दाऊदसेठ कुरेशी यांचा जिल्हा परिषदेमध्ये सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठाण यांनी दाऊदसेठ कुरेशी यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव, काँग्रेसचे देवानंद पवार, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, माजी सभापती गजानन शिंगणे, अजीम नवाज राही उपस्थित होते.

जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूलचे सुयश

बुलडाणा : जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भटच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद येथे शिवजयंतीनिमित्त शितो रिओ कराटे डु अकादमीतर्फे २१ फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये चमकदार खेळी करीत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

Web Title: Forget the mask in Dhamangaon Dhad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.