शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

न्यायालयाच्या आदेशानंतर शेगावातील ३६ घरे, दुकाने जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 2:18 AM

शेगाव : विकास आराखड्यांतर्गत संत गजानन महाराज मंदिरात येणाºया भाविकांसाठी पार्किंगस्थळ निर्मितीसाठी अखेर शुक्रवारी सकाळी खलवाडी भागातील १९ व मातंगपुरीतील १७ असे ३६ दुकाने व घरे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने केली. 

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात कारवाई, शहराला छावणीचे स्वरूप 

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : विकास आराखड्यांतर्गत संत गजानन महाराज मंदिरात येणा-या भाविकांसाठी पार्किंगस्थळ निर्मितीसाठी अखेर शुक्रवारी सकाळी खलवाडी भागातील १९ व मातंगपुरीतील १७ असे ३६ दुकाने व घरे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने केली. शेगाव विकास आराखड्यांतर्गत अनेक कामे गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयाप्रमाणे विकास आराखड्यांतर्गत खलवाडी भागात पार्किंग करण्याकरिता त्याठिकाणी वसलेल्या १९ दुकानदारांना बाजारातील बांधलेल्या नगर परिषद संकुलातील दुकाने गजानन महाराज संस्थानने प्रत्येकी २२ लाखप्रमाणे भरलेले आहे. ती दुकाने या व्यावसायिकांना खरेदीखत प्रमाणे त्यांच्या नावावर करून मातंगपुरीतील १७ घरे, दुकानदारांना दुकानाचे अर्धे गाळे नगरपालिकेने नऊ महिन्यात बांधून द्यावे, तोपर्यंत त्यांना दर महिन्याला ५ हजार रुपये महिना द्यावा, असा निर्णय दिला. त्यानुसार २७ एप्रिलला ही प्रतिष्ठान व घरे जमीनदोस्त करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे २६ एप्रिलला याविषयी पूर्ण आखणी करण्यात आली. २७ एप्रिलच्या सकाळी शेगाव शहरातील आंबेडकर चौकाकडे येणारी वाहतूक वळवण्यात आली. काही ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले. दुकानासमोरील एक बाजू कापडाच्या उंच कनाती लावून झाकण्यात आली होती, तर या मार्गावरील सर्व रहदारी बंद करण्यात आली. शिवाय विद्युत पुरवठासुद्धा खंडित करण्यात आला. शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलीस दलाच्या राखीव तुकड्याचे जवान, पोलीस पथकातील वाहने, वॉटर फोर्स वाहन, रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, मातंगपुरी वस्तीतील गायत्री मंदिरसुद्धा पाडण्यात आले. त्यामुळे भाविकांचे डोळे पाणावले होते. 

आजची कारवाई पूर्ण झाली असून, पुढील कारवाई उच्च न्यायालय व आयुक्तांच्या निर्देशानुसार केली जाईल. - अतुल पंत, मुख्याधिकारी, शेगाव. 

टॅग्स :Shegaonशेगाव