शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट गडद!

By admin | Updated: April 12, 2017 00:48 IST

खामगाव- चाऱ्याचे भाव गगणाला भिडले असून, जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पशुपालक हैराण: ज्वारी, मका उत्पादनाच्या पेऱ्यात घट

अनिल गवई - खामगाव

जिल्ह्यात ज्वारी, मका आणि चारावर्गीय पिकाच्या पेऱ्यात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून, चाऱ्याचे भाव गगणाला भिडले असून, जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चाऱ्याचे भाव चारपटीने वधारल्याने, ग्रामीण भागात चारा चोरी जाण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.परिसरात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाला, तर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी, पावसाच्या लहरीपणामुळे ज्वारी, मका पिकासोबतच इतर चारावर्गीय पिकांच्या पेऱ्यात कमालिची घट झाली. परिणामी, जमिनीतील पाणी पातळी खोल जात असतानाच अनेक भागातील पिकांनाही फटका बसला आहे. चारा वर्गीय पिकांना सातत्याने कधी जास्त, कधी अत्यल्प तर कधी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर शेती पिकाचे उत्पादन घटल्याने, तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीस काढली आहे; मात्र या जनावरांना योग्य भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून उपाय योजना करावी, अशी मागणी विविध परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.गोधन विक्रीकडे अनेकांचा कल!जिल्ह्यात निर्माण झालेल्या चारा आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा सांभाळ करणे कठीण झालेल्या पशू पालकांनी आपला मोर्चा गोधन आणि जनावरे विक्रीचा पर्याय निवडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात जनावरांच्या विक्रीत वाढ झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे गोपालकांना शासनाकडून सहकार्य करण्याची मागणी जोर धरत आहे.कडब्याच्या पेडींचे दर वधारले!महिना भरापूर्वी ज्वारीच्या कडब्याची एक पेंडी १८-२० रुपयांना मिळत होती. त्यानंतर दिवाळीच्या वेळी हीच पेंडी २२-२५ रुपयांवर पोहोचली; मात्र आता चाराच शिल्लक नसल्यामुळे २८-३० रुपयांपर्यंत या पेंडीचे दर पोहोचले आहेत. त्यामुळे चारा खरेदी करताना, शेतकरी तसेच जनावरे पालक चांगलेच मेटाकुटीस येत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.बागायतदार शेतकऱ्यांनाही फटका!बागायतदार शेतकऱ्यांनी चारा वर्गीय पिकांची लागवड करण्याचा प्रयत्न करीत, चारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र जमिनीतील पाणी पातळी खोल गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची ही पिकं शेतातच करपली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात चारा टंचाई ही तीव्र समस्या बनली आहे. खामगाव, मलकापूर, चिखली, सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने चाऱ्याची टंचाई भासत आहे. पाणी टंचाईचाही प्रश्न ऐरणीवर!चारा टंचाईसोबतच जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बाया-बापड्यांना संघर्ष करावा लागत असताना, जनावरांसाठी पाणी आणावे तरी कोठून? असा प्रश्न जिल्ह्यातील पशुपालकांना पडला आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.चारा चोरीच्या घटनांमध्ये वाढ!चारा टंचाईमुळे ग्रामीण भागामध्ये चाऱ्याला ‘सोन्याचे भाव’ आले असून, काही ठिकाणी चारा चोरीच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत. चारा वर्गीय पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाऱ्याच्या भावातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जनावरांची देखभाल करणे जिकरीचे होत आहे.- संतोष गव्हाळे, सधन कास्तकार,रोहणा ता. खामगाव