युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना जन्मठेप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:28 AM2017-11-14T01:28:50+5:302017-11-14T01:29:01+5:30

जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. 

Five people were given life imprisonment in the murder of a youth | युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना जन्मठेप 

युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना जन्मठेप 

Next
ठळक मुद्देतिघांची निर्दाेष सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जगदंबा देवी उत्सवादरम्यान झालेल्या भांडणातून घडलेल्या हत्याकांडातील पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर तिघांची निर्दोष सुटका केली. खामगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. 
शहरातील सतीफैलमधील अभिनव संजय तायडे (वय २२) या युवकास ४ जानेवारी २0१६ रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास राहुल उज्जैनवाल, कालू आठवले, सुरज सारवान, विजय सारवान यांनी भुसावळ चौकात थांबवून मारहाण केली होती. जगदंबा देवी उत्सवादरम्यान मंडपाच्या किरकोळ बाबीवरून हा वाद उफाळला होता. मारहाण करीत असताना अभिनव तायडे हा जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. तेव्हा विजय सारवान याने धारधार शस्त्राने त्याच्या पाठीवर वार केले. याशिवाय सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल यानेसुद्धा अभिनवला मारहाण केली. त्यामुळे आठवडी बाजारातील देशी दारूच्या दुकानासमोर तो जखमी अवस्थेत खाली पडला. आकाश पिवाल, धर्मा सुसगोहर, राम पिवाल, कालू आठवले यांनी हातपाय धरून पकडून ठेवले. सुरज सारवान, राहुल उज्जैनवाल, विजय सारवान यांनी अभिनवच्या पोटावर व छातीवर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेची तक्रार अभिनवचा मामा देवीदास धुरंधर यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती. त्यावरुन सुरज सारवान (वय १९) रा. सतीफैल, विजय राजू सारवान (वय २१) रा. रेखा प्लॉट, आकाश जीवन पिवाल (वय २३), राम जीवन पिवाल (वय २५), धर्मा शांतीलाल सुसगोहर (वय २६), काल आठवले (वय २३), राहुल उज्जैनवाल (वय २१) सर्व रा. सतीफैल, राजू सारवान (वय ५0) रा. रेखा प्लॉट या आठ जणांविरुद्ध कलम ३0२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, १0९, १२0 (ब), १३५ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन ठाणेदार डी.डी.ढाकणे यांनी प्रकरणाचा तपास केला होता.

Web Title: Five people were given life imprisonment in the murder of a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.