आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:30 IST2025-04-21T12:30:01+5:302025-04-21T12:30:53+5:30

बुलढाण्यात आधी केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाल्याचे समोर आले आहे.

First hair loss, now fingernail loss; Pune health team reaches Buldhana | आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

काही दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अनेकांची अचानक केस गळती झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. आधी ज्या लोकांची केस गळती झाली होती, त्यांची आता नखं गळती सुरू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता या प्रकरणी आरोग्य विभाग अॅक्शनमोडवर आले आहे. पुण्यातून एक पथक आज बुलढाण्यात पोहोचले आहे. 

शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगाव सह परिसरातील गावात सुरुवातीला केस गळती आणि आता नागरिकांच्या नख गळतीने खळबळ उडाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबविता आलेले नाही.

"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 

दरम्यान, आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईन डायरेक्टर डॉ. बबिता कमलापूरकर यांनी या गावात भेट दिली. यावेळी नखं गळती  झालेल्या बाधित रुग्णांची त्यांनी चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे  तीन महिन्यांपूर्वी केस गळतीमुळे हे गाव प्रकाश झोतात आले होते. दरम्यान दिल्ली येथील आयसीएमआर च्या पथकाने  या गावात पोहोचून केस, नखं अन्नधान्य, पाणी रक्तांचे नमुने घेऊन गेले होते. 

मात्र त्यांचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच आता नखं गळतीचे रुग्णसमोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

नखं गळती बाबत तपासण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. उद्याही गावांमध्ये दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहेत. गावकऱ्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. लवकरच निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पुणे येथील आरोग्य विभागाच्या जॉइंट डायरेक्टर डॉ. बबीता कमलापूरकर यांनी दिली.

Web Title: First hair loss, now fingernail loss; Pune health team reaches Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.