फैजलापुर येथे घरासह गोठ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 12:45 IST2019-05-05T12:45:01+5:302019-05-05T12:45:11+5:30

मेहकर :   तालुक्यातील फैजलापूर येथे घर व गोठ्याला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

Fire breaks in Faizalpur house | फैजलापुर येथे घरासह गोठ्याला आग

फैजलापुर येथे घरासह गोठ्याला आग

मेहकर :   तालुक्यातील फैजलापूर येथे घर व गोठ्याला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत गोठ्यातील गुरांचा चारा व घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. 
फैजलापूर येथील सखुबाई कडुबा मुळे यांच्या टिन पत्राच्या  घराला अचानक आग लागून त्यांच्या घरांमधील गहू, टीव्ही, भांडी व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये एकूण ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर त्यांच्याच घराला लागून असलेले लक्ष्मण नामदेव बोडखे यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. यामध्ये त्यांच्या टिन पत्राच्या गोठ्यातील आठ ट्रॉली सोयाबीन, तूर व हरभरा कुटार जळाले आहे. यामध्ये ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा पंचनामा तलाठी यांनी करून तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fire breaks in Faizalpur house