अखेर बुलडाणा जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये लाॅकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 16:54 IST2021-02-22T16:49:17+5:302021-02-22T16:54:26+5:30
Lockdown in Buldhana बुलडाणा, चिखली, देउळगावराजा, खामगाव आणि मलकापूर नगर पालिका क्षेत्र प्रतिबंधीत म्हणून घाेषीत करण्यात आले आहेत.

अखेर बुलडाणा जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये लाॅकडाउन
बुलडाणा: जिल्ह्यात काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता बुलडाणा, चिखली, देउळगावराजा, खामगाव आणि मलकापूर या पाच शहरांमध्ये २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते १ मार्चपर्यंत लाॅकडाउन करण्यात आले आहे. बुलडाणा, चिखली, देउळगावराजा, खामगाव आणि मलकापूर नगर पालिका क्षेत्र प्रतिबंधीत म्हणून घाेषीत करण्यात आले आहेत. या पाच शहरांमध्ये जीवनाश्यक वस्तुंची दुकाने ही केवळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. शहरांसह ग्रामीण भागातही काेराेना रुग्ण वाढत असल्याने सलग दुसऱ्या दिवशी ३०० पेक्षा जास्त काेराेना पाॅझिटीव्ह रुग्ण निघाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची उपाययोजना म्हणून अमरावती विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधात्मक क्षेत्र व इतर क्षेत्रासाठी लाॅकडाऊनच्या निर्देशांचीच घाेषणा केली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी बुलडाणा, चिखली, देउळगाव राजा, खामगाव आणि मलकापूर प्रतिबंधात्मक शहरे घाेषित केले आहेत.या शहरांमध्ये २२ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ६ वाजतापासून लाॅकडाऊनचे आदेश देण्यात आले आहे. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये केवळ जीवनाश्यक वस्तुंची दुकाने ही केवळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.