अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 17:54 IST2021-05-05T17:50:56+5:302021-05-05T17:54:03+5:30

Crime News : तामगाव पोलीस ठाणे अंतर्गत गावात घडली घटना.

Filed a case of molestation of a minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

संग्रामपूरः शौचास गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी युवकाने हात पकडून गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना तामगाव पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात घडली. याबाबत दि. ४ रोजी रात्री उशिरा मुलीच्या तक्रारीवरून तामगाव पोलिस स्टेशनला गून्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील ग्राम उमरा पानाचे येथील १६ वर्षीय मूलगी शौचास वरून येत असतांना गावातीलच ३५ वर्षीय यूवकाने अल्पवयाचा गैरफायदा घेत वाईट उद्देशाने पिडीताचा उजवा हात पकडला व गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपी दिपक श्रिपत तायडे याच्यावर कलम ३५४, ३५४(अ), ५०६ भादवि सह कलम ८, १२ बालकांचे लैंगिक अपराघ संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास तामगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे करीत आहेत.

Web Title: Filed a case of molestation of a minor girl