समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 18:24 IST2024-10-31T18:20:05+5:302024-10-31T18:24:14+5:30
समुद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्याकडून अमरावतीला जात असताना भरधाव कारने समोरील वाहनाला मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.
समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडोरव पुणे वरून अमरावतीकडे जाणाी कार समोरील ट्रकला मागून उजवी बाजूला धडकल्याने हा अपघात झाला. कार मधील प्रवाशी शुभांगी दाभाडे वय 32 वर्ष, राजेश दाभाडे वय 42 वर्ष हे जागीच ठार झाले. तसेच गाडी मधील रियांश राजेश दाभाडे वय 4 वर्ष हे ॲम्बुलन्स द्वारे सा.ग्रा. सिंदखेड राजा येथे नेत असताना मयत झाला आहे.
तसेच समीक्षा राजेश दाभाडे,आश्विन धनवरकर गाडी चालक हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना ॲम्बुलन्स मध्ये औषधोपचार देण्यात आला. ट्रक चालक खाजा शेख राहणार जालना याला ताब्यात देण्यात आले आहे. तर अपघातग्रस्त वाहनाला बॅरिगेटिंग करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू आहे.