शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 5:47 PM

बुलडाणा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा जगविणे अवघड झाले असून, फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.

बुलडाणा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा जगविणे अवघड झाले असून फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. उन्हाळ्यात किंवा दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्यासाठी सुक्ष्म  सिंचन मुख्यत: ठिबक पध्दतीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ५० ते ६० टक्के पाणी बचत होते. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक या योजने अंतर्गत अल्प, अत्यल्प भूमीधारी शेतकरी व  अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकºयांना एकूण खर्चाच्या ५५ टक्के अनुदान व इतर शेतकºयांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते. राज्यात प्रामुख्याने  नारळ, चिकु, सुपारी, केळी, पपई, पेरु, द्राक्ष, डाळींब, सिताफळ, लिंबू, मोसंबी, संत्रा, आंबा,  सिताफळ, बोर, आवळा, पपई आदी फळपिके घेतली जातात.  दुष्काळी परिस्थिीमुळे कृषी विभागाकडून सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा व कमीत कमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा  टिकवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.  उन्हाळ्यामध्ये मटका सिंचनद्वारे फळबागा  जगविणे शक्य आहे. फळबागांच्या वयोमानानुसार प्रतिझाड पाच लिटर क्षमतेचे दोन ते चार मटक्याचा उपयोग करावा.  मटक्याच्या तळाशी  छिद्र पाडून  त्यामध्ये कपड्याची  गाठ बसवून मटक्याचे तोंड जमिनीच्या दोन इंच वर राहील, अशा बेताने ज्या भागात झाडाची तंतुमय मुळे जास्त प्रमाणात असतील. (दुपारी १२ वाजता झाडाच्या सावलीच्या आतील बाजूस) पुरवावे. यामुळे आवश्यकते नुसार व सतत झाडाला पाण्याचा पुरवठा होत राहील, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ठिबक सिंचनासोबत आच्छादनाचा  वापर केला तर प्रखर सूर्यप्रकाशामुळे व अधिक तापमानामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन आटोक्यात येईल.  जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहील व जमिनीची धूपदेखील कमी होईल. आच्छादनासाठी वाळलेले गवत, पालापाचोळा, सोयाबीनचा भुसा, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, केळीची वाळलेली पाने, तुरकाड्या,  लाकडाचा भूसा आदींचा उपयोग करता येतो.  अशा नैसर्गिक आच्छादनाची जाडी ही १२ ते १५ सेमी असावी व हे आच्छादन झाडाच्या पूर्ण परिघात करावे, अशी माहिती कृषि विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी