शेतक-यांनी केले ‘उलटे टांगो’ आंदोलन!

By Admin | Updated: June 9, 2017 01:15 IST2017-06-09T01:09:11+5:302017-06-09T01:15:45+5:30

उलट्या काळजाच्या सरकारचा निषेध : धानोरा शिवारातील शेतकरी लटकले आंब्याच्या झाडाला!

Farmers raised 'Inverted Hang' movement! | शेतक-यांनी केले ‘उलटे टांगो’ आंदोलन!

शेतक-यांनी केले ‘उलटे टांगो’ आंदोलन!

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : उलट्या काळजाच्या सरकारला सरळ सांगून समजत नाही म्हणून शेतकर्‍यांनी ह्यउलटे टांगोह्ण आंदोलन करीत सरकारच्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न केला. नांदुरा तालुक्यातील तीन गावातील शेतकर्‍यांनी धानोरा शिवारातील शेतात आंब्याच्या झाडाला उलटे लटकून गुरुवारी अभिनव आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या १ जूनपासून शेतकर्‍यांचा संप सुरू असून, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात आहेत. या अंतर्गत गुरुवार, ८ जून रोजी नांदुरा तालुक्यातील धानोरा विटाळी, काटी व शिरसोडी या तीन गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आंब्याच्या झाडाला उलटे टांगण्याचे आंदोलन केले. आंब्याच्या डहाळ्यांना उलटे लटकवून घेत शेतकर्‍यांनी उलट्या काळजाच्या सरकारचा निषेध व्यक्त केला.
यावेळी शेतकरी गुलाबराव पाटील, समाधान वानखडे, भानुदास पाटील, सोपान चोपडे, रमेश पाटील, सुभाष कोल्हे, भागवत वानखडे, गोंविद गिरी, देवीदास पाटील, विष्णू पाटील, भागवत पाटील, मोहन पाटील, माणिकराव नरवाडे, श्रीकृष्ण दांडगे, प्रकाश दांडगे, विष्णू वानखडे, अमोल वानखडे, जानराव ठाकरे, आशिष बाठे, अजाबराव जंगले, कैलास नरवाडे, संदीप चोपडे, शत्रुघ्न चोपडे, मंगेश गाडे, भाऊराव नरवाडे, तुकाराम बोंडे, भानुदास बोरसे, सुरेश नरवाडे, अशोक नरवाडे, अशोक आमले, दिनेश बोंडे, किशोर बोंडे, सुनील बोंडे यांची उपस्थिती होती.

Web Title: Farmers raised 'Inverted Hang' movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.