विद्यूत तारांमुळे आग लागून शेतकऱ्याचे ९ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:43 PM2019-08-07T12:43:51+5:302019-08-07T12:44:11+5:30
मोताळा : शेतात लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांमुळे आग लागून लागल्यामुळे शेतकऱ्याचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले.
मोताळा : शेतात लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांमुळे आग लागून लागल्यामुळे शेतकऱ्याचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र महावितरणकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील चिंचपूर येथील शेतकरी पिता-पुत्रांनी तहसिलदारांना आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शेतकरी एकनाथ शंकर पाटील यांनी मालकीची डिडोळा बु. गट क्र. १८५ मधील १ हेक्टर ४१ आर या क्षेत्रातील ८० आर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास शेतातील विद्युत तार तुटल्याने आग लागली. आगीमध्ये शेतकºयाचे ५० ट्रॉली शेणखत जळुन खाक झाले. शेतात विजतारा लोंबकळलेल्या आहेत याबद्दल बहुरुपे यांनी महावितरण कार्यालयाला कळविले होते. अनेकदा तक्रारीही महावितरणकडेही केल्या होत्या. मात्र महावितरणने कोणतेही दखल घेतली नाही. आगीत शेतकºयाचे जवळवास ९ लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी, तहसीलदारांनी समक्ष पंचनामा करुन अद्यापपर्यत कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. नुकसानाची मदत १५ आॅगस्टपर्यत मिळाली नाही तर आत्मदहनाचा इशारा एकनाथ शंकर पाटील व लखन एकनाथ पाटील यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)