शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीत भरडला जातोय शेतकरी!

By admin | Updated: April 24, 2017 00:27 IST

मोजणीनंतर पैशासाठीही करावी लागत आहे दीर्घ प्रतीक्षा

संदीप गावंडे - नांदुरासध्या जिल्ह्यात तसेच राज्यातही तूर उत्पादक शेतकऱ्यांवर कधी नव्हे एवढी कठीण परिस्थिती आली आहे. तूर विक्रीकरिता एक ते दीड महिन्यांचा प्रतीक्षेचा कालावधी, विक्रीनंतर बँक खात्यात तुरीचा चेक जमा व्हायचा पंधरा दिवसाचा काळ व पैसे जमा झाल्यावर बँकातून मिळणारे केवळ १० ते २० हजार अशा दुष्टचक्रात सध्या शेतकरी अडकलेला असून, शासकीय धोरणांमुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे. आता सहनशीलता संपत असल्याने कुठे आंदोलने, तर कुठे आत्महत्येच्या घटना घडत आहेत. आपला देश हा कृषीप्रधान आहे, असे आपण बिरुद मिरवतो; परंतु ज्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या भरवशावर आपण कृषीप्रधान म्हणून मिरवतो, त्या शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आज शासन तसेच प्रशासनालाही राहिली नसल्याचा प्रत्यय सध्याच्या तूर खरेदीतील दीर्घ विलंब व त्यात घडणाऱ्या गैरप्रकारांमुळे येत आहे. एक महिन्यापेक्षाही जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावर तूर विक्रीला आणली असून, उन्हातान्हात तुरीची रखवाली करणे सुरू आहे. प्रत्येक घरातील दोन व्यक्ती रात्री व दिवसा असे तुरीच्या गंजीवर अडकले असून, आज ना उद्या मोजमाप होईल, अशी आशा त्यांना लागून आहे. अशातच रात्रीच्या अंधारात गैरमार्गानी तूर मोजणी करताना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडल्यावरही सदर प्रकार दाबण्याचा झालेला प्रयत्न, शेतकऱ्यांची चोरीला गेलेली २३ कट्टे तूर, या प्रकारामुळे नांदुरा येथील तूर खरेदी गाजत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येबाबत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन काय भूमिका घेत आहे, हे संपूर्ण तालुका पाहत आहे. नजिकच्या काळात निवडणुका नसल्याने लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांशी सध्यातरी काही देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी भरडला जात असल्याचे दिसून येते.आई जेवू घालिना, बाप भीक मागू देईना...केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. मलकापूर व नांदुरा तालुक्याचे आमदार व खासदारही भाजपाचेच आहेत. भरीस भर राज्याचे कृषीमंत्री सुद्धा नांदुरा तालुक्याचेच सुपुत्र आहेत. अशा परिस्थितीत नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कोणीच पुढे येत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनीच रास्ता रोको केला. पण, आंदोलने केल्यास लाठीचार्ज करण्याचा दम प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांना देत असून, यामुळे ‘आई जेवू घालिना बाप भीक मागू देईना’ अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग निराशेच्या गर्तेत जात आहे.