शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:21 IST2019-07-16T12:19:44+5:302019-07-16T12:21:57+5:30

शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेदरम्यान घडली.

Farmers commit suicide in mehkar | शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देमोतीराम फकीरा वानखेडे (६०) यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर ग्रामीण  बँकेचे कर्जही आहे.


मेहकर: तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेदरम्यान घडली.
तालुक्यातील उमरा देशमुख येथील मोतीराम फकीरा वानखेडे (६०) यांनी उमरा देशमुख शिवारातील स्वत: च्या शेतात निंबाच्या झाडाला दोरी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी विद्यार्थी शाळेत जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मोतीराम वानखेडे यांच्या घरची परिस्थिती हालाकीची असून त्यांच्यावर ग्रामीण  बँकेचे कर्जही आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers commit suicide in mehkar