शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कृषीमंत्र्यांच्या घरासमोर शेतकर्‍यांचा चार तास ठिय्या; बोंडअळीची केली होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:43 IST

राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहिर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याघरासमोर शेतकर्‍यांनी बोंडअळीची होळी केली.

ठळक मुद्देप्रती हेक्टरी १ लाख रुपये अनुदान देण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहिर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याघरासमोर शेतकर्‍यांनी बोंडअळीची होळी केली. जोपर्यंत कृषीमंत्री भेटत नाही तोपर्यत उठणार नाही अशी भूमिका घेत तब्बत चार तास शेतकर्‍यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. संपूर्ण महाराष्ट्रात कपाशीवरील बोंडअळीने शेतकर्‍यांची उभी पिके उद्धस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधी सोयाबीन गेले अन आता कापूस शेतकर्‍यांना काय करावे काही सुचेनासे झाले आहे. शेतकर्‍यांनी आत्मदहनासारखे निवेदने देवूनही सरकारला जाग आली नाही. कापूस कायद्याअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांकडून भरून घेत असलेल्या नमुना जी व नमुना एच, नमुना आय मधील जाचक अटी शिथिल करून तत्काळ सरसकट पंचनामे करणे आवश्यक आहे. परंतू शासनाने यामध्ये केवळ वेळकाढू धोरण अवलंबल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. सावकार व बँकांचे कर्जवसूलीसाठी सक्तीचे तगादे सुरु झाले आहे. अर्थसंकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकाकडून मदतीचा हात मागण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खामगावात कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कृषी मंत्री खामगावात नसल्याने त्यांची भेट होवू शकली नाही. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकर्‍यांनी जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत न उठण्याचा निर्णय घेतला. तब्बत पाच तास शेतकरी रस्त्यातच ठिय्या देवून बसून होते. शेवटी एसडीओ व तहसिलदार यांनी धाव घेत भूमिका समजून घेवून निवेदन स्विकारले. 

सरकारकडून शेतकरी बेदखल औरंगाबाद येथे २४ नोव्हेंंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहनासारखे आंदोलन करुनही शासन कोणतीही दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार शेतकºयांच्या मरणावर उठले की काय ? असा सवाल संतप्त शेतकºयांनी व्यक्त केला. 

लोकमतने वेधले होते लक्षबोंडअळीच्या प्रार्दुभावाने शेतकरी संकटात या आशयाचे वृत्त लोकमतने २८ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित करून या विषयाकडे लक्ष वेधले होते हे विशेष. बोंडअळीच्या नुकसानीवर प्रकाश टाकल्याबद्दल शेतकºयांनी लोकमतचे आभार मानले.

हेक्टरी १ लाख अनुदान मिळावेझालेल्या नुकसान भरपाईबाबत आम्ही न्याय मागायला आलो. पण आमच्यासोबत कृषीमंत्री बोलायलाही तयार नाही. शेतकºयांसोबत सरकारची भूमिका असंवेदनशिल आहे.  बोंडअळीच्या नुकसानभरपाईपोटी सरसकट पंचनामे करून १ लाखाचे शेंद्री बोंडअळी अनुदान मिळावे. - संतोष पाटील जाधव, (शेतकरी नेते तथा अर्थ व बांधकाम सभापती), जि.प.औरंगाबाद. 

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरagitationआंदोलन