शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त!

By admin | Updated: April 24, 2017 02:53 IST

१७७ कोटींचे चुकारे : १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

बुलडाणा : खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादक शेतकऱ्यांची लूट होऊ नये, यासाठी शासनाने नाफेड व एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून, तुरीला ५०५० रुपये हमीभाव दिला आहे. हमीभावाचे चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करून खरेदी बंद करण्यात आली. तरीही विविध खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी खरेदी केंद्रावर असलेली तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.नाफेडने जिल्ह्यातील शेगाव, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, संग्रामपूर, बुलडाणा, सिंदखेड राजा या खरेदी केंद्रावरून २२ एप्रिल अखेर २ लाख २६ हजार २०५ क्विंटल, तर एफसीआयच्यावतीने खामगाव, मलकापूर, लोणार, नांदुरा जळगाव जामोद या खरेदी केंद्रावरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तरीही खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे. यावर्षी शासनाने नाफेड एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून तुरीला ५०५० रुपये हमी भाव दिला आहे. हमी भाव चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, खरेदी केंद्रावर तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे काही दिवसातच बारदाना संपून गेला होता. विविध पक्ष संघटनाच्या आंदोलनानंतर शासनाने बारदाना उपलब्ध करून दिला होता; परंतु तुरीची आवक पाहता शासनाने तूर खरेदीची मुदत ही २२ एप्रिलपर्यंत ठरवून दिली होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी शेवटच्या दिवसापर्यंत नाफेडने सात खरेदी केंद्रांवरून २ लाख २६ हजार २०५ क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. तर एफसीआयने पाच खरेदी केंद्रांवरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ तुरीची खरेदी केली आहे. दरम्यान, नाफेडने ११४ कोटी रुपयांच्या तुरीची खरेदी केली. त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. एफसीआयने ११४ कोटी ६८ लाख ६० हजार ९५४ रुपयांची तूर खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ९४ कोटी ८७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक फटकानाफेड एफसीआयच्या खरेदी केंद्रावर जवळपास पावणे दोन लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाचे तूर खरेदी केंद्र बंद झाल्यास नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात आपली तूर खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे. परिणामी त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर असलेली तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत. शासनाने २२ एप्रिल ही तूर खरेदीची मुदत दिली होती. त्यामुळे आजपर्यंत नाफेडने २ लाख २६ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटींचे चुकारे देण्यात आले आहेत. यानंतर शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.- पी.एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.