शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:44 IST

चिमूर तालुक्यातील खुटाळा येथे गोठ्यात बांधून असलेल्या शेळी व बोकडावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. यासोबतच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास भेंडी तोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरही बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले.

ठळक मुद्देखुटाळा येथील घटना : एक शेळी व एक बोकड ठार

लोकमत न्यूज नेटवर्कनेरी : चिमूर तालुक्यातील खुटाळा येथे गोठ्यात बांधून असलेल्या शेळी व बोकडावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. यासोबतच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास भेंडी तोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरही बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले.खुटाळा येथील रहिवासी गुलाब शेंडे यांच्याकडे स्वत:च्या मालकीच्या १२ शेळ्या व दोन बोकड आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री घरालगतच्या गोठ्यात शेळ्यांना बांधून ठेवले होते. सकाळी गोठ्याची साफसफाई करण्यासाठी गेले असता, एक शेळी व बोकड मृतावस्थेत आढळून आले. बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते. यात त्यांचे जवळपास १४ हजारांचे नुकसान झाले आहे. लगेच वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मोका चौकशी करून पंचनामा केला. दरम्यान, रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नारायण गुरुनुले हे गावालगतच्या शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. आरडाओरड केल्यानंतर आजुबाजुचे शेतकरी धावून आले.त्यामुळे बिबट्याने पळ काढला. यात नारायण जखमी झाले. लगेच त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले आहे. वनविभागाकडून तत्काळ तात्पुरती एक हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यावेळी क्षेत्र सहायक खोब्रागडे, पुसतोडे, सोनुले, मसराम उपस्थित होते.