रोही हरणामुळे शेतकरी हैराण
By Admin | Updated: August 19, 2014 23:21 IST2014-08-19T22:41:14+5:302014-08-19T23:21:19+5:30
रोही, हरणामुळे पिकाचे नुकसान होत असून शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

रोही हरणामुळे शेतकरी हैराण
पिंपळगाव सैलानी : पिंपळगाव सैलानी परिसरात रोही, हरणामुळे पिकाचे नुकसान होत असून शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई, सैलानी, रायपूर, पळसखेड भट या गावच्या परिसरात रोही, हरिण या वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतात पेरणी केल्यापासून शेतकरी वर्गाला रात्रंदिवस आपल्या पिकांची देखरेख करावी लागत आहे. वन्यप्राणी रात्रीच्या वेळी जंगलाकडून केव्हाही शेतात घूसून पिकांचे नुकसान करीत आहे. या गावच्या सर्व बाजूने जंगल आहे व या जंगलात जवळपास ५00 च्या वर रोही, २00 च्या वर हरिण आहेत. हे वन्यप्राणी शेतात घुसले की, संपूर्ण पिके उद्ध्वस्त करीत आहे. तरी वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रकाश गवते, रमेश गवते, संजय चव्हाण आदी शेतकर्यांनी केली आहे.