न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत जोडली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:39 AM2017-11-02T01:39:04+5:302017-11-02T01:39:30+5:30

मलकापूर : पदमान्यता प्रकरणात न्यायालय आदेशाची खोटी व बनावट प्रत जोडल्याचे आढळून आल्याप्रकरणी शहरातील मासुमिया उर्दू शिक्षण संस्थेंतर्गत झेड.ए. उर्दू हायस्कलूच्या दोन शिक्षकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत त्यांना ३0 ऑक्टोबरला अटक केली असून, मंगळवारी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Fake copy of court order added! | न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत जोडली! 

न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत जोडली! 

Next
ठळक मुद्देदोन शिक्षकांवर फसवणुकीचा गुन्हा पोलीस कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : पदमान्यता प्रकरणात न्यायालय आदेशाची खोटी व बनावट प्रत जोडल्याचे आढळून आल्याप्रकरणी शहरातील मासुमिया उर्दू शिक्षण संस्थेंतर्गत झेड.ए. उर्दू हायस्कलूच्या दोन शिक्षकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत त्यांना ३0 ऑक्टोबरला अटक केली असून, मंगळवारी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सन २00९ मध्ये झेड.ए. उर्दू हायस्कूल येथे कार्यरत शिक्षक आसीफ खान अब्दुल्ला खान (वय ३७) व सहशिक्षक तनवीर अहेमद खान शब्बीर खान (वय ३३) या दोन शिक्षकांच्या अँप्रोवल फाइलमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाची खोटी व बनावट प्रत आढळून आली. 
ही बाब माहिती अधिकारान्वये उघड झाल्यानंतर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील  डेप्टी रजिष्टार आर. एन. मानापुरे यांनी स्थानिक नागपूर पोलीस प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. 
हे प्रकरण मलकापूर पोलिसांकडे नागपूर पोलिसांनी २0१३ मध्ये वर्ग केले होते. त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडून चौकशी सुरू होती. 
चौकशी अंती याप्रकरणी आसीफखान अब्दुल्ला खान व तनवीर अहेमद खान शब्बीरखान हे दोघे शिक्षक व सह शिक्षक दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर मलकापूर शहर पोलीस स्टेशनला अप.नं.७७/१३ कलम ४२0, ४६८, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन या दोन आरोपींना ३0 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. 
त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे करीत आहेत. 

Web Title: Fake copy of court order added!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा