रक्षाबंधनानिमित्त एसटी सोडणार जादा बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:00 IST2019-08-14T17:00:46+5:302019-08-14T17:00:56+5:30

बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.

Extra buses will run for Raksha Bandhan | रक्षाबंधनानिमित्त एसटी सोडणार जादा बसेस

रक्षाबंधनानिमित्त एसटी सोडणार जादा बसेस

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारातून दैनंदिन किलोमीटरच्या दहाटक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये लांब पल्ल्याच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ९ आगारांकडूनही जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
'रक्षाबंधन'निमित्तएसटी  महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी  आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, मेहकर आणि चिखली या सातही आगारासोबतच देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, नांदुरा, मोताळा आणि लोणार या वाहतूक नियत्रंण केंद्रावरूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये गुरूवारी दैनंदिन वाहतुकीच्या तुलनेत दहा ते १२ टक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना यामध्ये प्राधान्य दिल्या जाणार असून त्या दृष्टीकोनातून प्रत्येक आगारातून अतिरिक्त वाहतुकीचे नियोजन केले आहे.


 एसटी कर्मचाºयांच्या रजा बंद!
रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळातील चालक-वाहकांसोबतच कार्यालयीन कर्मचाºयांच्या रजा यापार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्याची माहिती आहे. रक्षाबंधन सणाच्या कालावधीत   सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करुन प्रवाशांना सुरक्षित व वक्तशिर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे समजते. यासाठी एसटी बसस्थानके, बस थांब्यावर वरिष्ठ अधिकाºयांच्या देखरेखीखाली कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. रक्षा बंधनानिमित्त प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

 

Web Title: Extra buses will run for Raksha Bandhan