अनुकंपाधारक उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:05+5:302021-07-07T04:43:05+5:30
पूल ठरतोय धोकादायक! देऊळगाव राजा : ग्रामीण भागात केवळ रस्त्यांचीच दयनीय अवस्था झाली नाही, तर अनेक रस्त्यांवरील पूलदेखील खचण्याच्या ...

अनुकंपाधारक उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी
पूल ठरतोय धोकादायक!
देऊळगाव राजा : ग्रामीण भागात केवळ रस्त्यांचीच दयनीय अवस्था झाली नाही, तर अनेक रस्त्यांवरील पूलदेखील खचण्याच्या मार्गावर असून, वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. प्रवाशांसह वाहनचालकांना जीव मुठीत घेत प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लाभार्थी घरकुलापासून वंचित
मेहकर : तालुक्यातील अनेक ठिकाणी अनुसूचित जातीचे लाभार्थी अजूनही घरकुल योजनेपासून वंचित आहेत. लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र या योजनेची सखोल अंमलबजावणी होत नाही.
जनावरांच्या लसीकरण कार्यक्रमांचा अभाव
देऊळगाव राजा : दरवर्षी पावसाळ्यात कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषीदूतांकडून जनावरांच्या आजार प्रतिबंधासाठी लसीकरणाचे प्रात्यक्षिक घेतले जाते. पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार उद्भवतात. परंतु यंदा लसीकरण कार्यक्रमांचा अभाव दिसून येत आहे.
कीटकनाशक फवारणीबाबत जनजागृतीची गरज
बुलडाणा : सध्या तणनाशक फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून कीटकनाशक फवारणी व घ्यावयाची काळजी याबद्दल जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याची गरज निर्माण झाली आहे.