शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

By admin | Updated: April 25, 2017 20:13 IST

वाशिम : लघु पाटबंधारे प्रकल्प मिर्झापूर धरणाच्या अर्धवट कामामुळे धरणातील पाणी धरणात थांबत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

वाशिम : लघु पाटबंधारे प्रकल्प मिर्झापूर धरणाच्या अर्धवट कामामुळे धरणातील पाणी धरणात थांबत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. धरणाचे काम त्वरित पूर्ण करुन धरणाचे पाणी अडविण्याच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह शिरपूर, मिर्झापूर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर २५ एप्रिल रोजी धडक देवून मागणी केली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.लघु पाटबंधारे मिर्झापूर प्रकल्प गत १४ वर्षांपासून प्रलंबित पडला आहे. केवळ एक ते दोन दिवसात होणारे कामच शिल्लक असतांना याकडे संबधितांकडून दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या नियमानुसार अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार सदर काम ३ वर्षामये पूर्ण होणे अपेक्षित असतांना आज रोजी हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या बागा वाळणे, पिण्यासाठी गुरांना भटकंती करावी लागत आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास शासनाच्या पैशातही वाढ होत आहे. याकडे मात्र कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. सदर प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास यावर्षी येणाऱ्या पावसाळयामध्ये त्या पाण्याचा योग्य वापर होवू शकते. तरी याकडे लक्ष देवून सदर प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून केली. यावेळी गणेश पा. ईरतकर, गजानन निंबाजी गाभणे, रामेश्रर निवृत्ती इरतकर, ओमकार चोपडे, सिताराम बोबडे, सुरेशभाऊ वाळले, गजानन कुटे, दिलीप बाविस्कर, रमेश मंत्री, राजु मंत्री, सुभाष सोमटकर, गजानन भांदुर्गे, सोनु देशमुख, राजु राऊत, संतोष राऊत, सुभाष इरतकर, श्रीराम मोरे, तेजराव सोमटकर, भागवत सोमटकर, रामकिसन सोमटकर, गजानन काळे, ज्ञानेश्वर गावंडे, बंडु मंत्री यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश होता.