भुगटार योजनेपासून होणारा त्रास संपता संपेना.
By Admin | Updated: June 18, 2014 00:39 IST2014-06-17T21:43:38+5:302014-06-18T00:39:37+5:30
भुगटार योजनेच्या कामांपासून सर्वात जास्त त्रास होत आहे.

भुगटार योजनेपासून होणारा त्रास संपता संपेना.
शेगाव : शहरात सुरू असलेली विकास आराखड्याची कामे शहरवासियांसाठी डोकेदुखी ठरत असून यामध्ये भुगटार योजनेच्या कामांपासून सर्वात जास्त त्रास होत आहे. आज सकाळी त्यांची पुन्हा प्रचिती पाहावयास मिळाली असून स्थानिक बसस्टॅण्डसमोर सुरू असलेल्या भुगटार योजनेच्या कामाच्या जागी एक टँकर फसून नाहक तास दिडतास वाहतूक खोळंबली होती. विकास आराखड्याच्या कामांपासून नागरीकांना होणारा त्रास संपता संपेना, अशी म्हणण्याची वेळ आली असून शहरभर खोदलेले रस्ते यापासून होणारा त्रास व खोदकाम केल्याजागी फसणारी वाहने यामुळे वाहतुकीस होत असलेला खोळंबा असे सर्व त्रासदायक प्रकार विकास आराखड्याची सुरू झाल्यापासून सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. आजच्या टँकर फसण्याच्या घटनेमुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस खोळंबा झाला होता. फसलेले पाण्याचे टँकर रिकामे करून नंतर काढण्यात आले होते. तोपर्यंत दोन्हीकडील वाहतुक खोळंबुन नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तेव्हा संबंधितांनी नेहमी होणारा त्रास पाहता दखल घेणे गरजेचे आहे.