भाऊसाहेबांचा 'शत प्रतिशत भाजपा'चा नारा बुलंद करा - आमदार आकाश फुंडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:37 IST2018-07-04T14:36:22+5:302018-07-04T14:37:43+5:30

खामगांव- स्व.भाऊसाहेबांचा ‘शत प्रतिशत भाजपा'चा नारा बुलंद करा, असे आवाहन खामगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले.

Empowering Bhausaheb's 'hundred percent BJP' - MLA Akash Phundkar |  भाऊसाहेबांचा 'शत प्रतिशत भाजपा'चा नारा बुलंद करा - आमदार आकाश फुंडकर 

 भाऊसाहेबांचा 'शत प्रतिशत भाजपा'चा नारा बुलंद करा - आमदार आकाश फुंडकर 

ठळक मुद्देखामगांव शहर भारतीय जनता पाटीर्ची बैठक शहरातील टॉवर चौक कार्यालयात पार पडली.सरकारने केलेली कामे व लोकहिताचे निर्णय जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम प्रत्येक कार्यकत्यार्ने करावे,  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

लोकमत न्युज नेटवर्क 
खामगांव- स्व.भाऊसाहेबांचा ‘शत प्रतिशत भाजपा'चा नारा बुलंद करा, असे आवाहन खामगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले. खामगांव शहर भारतीय जनता पाटीर्ची बैठक शहरातील टॉवर चौक कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते पुढे   म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे.  कार्यकर्ते हेच पक्षाची संपत्ती आहे.  आणि म्हणून स्व.भाऊसाहेबांनी या कार्यकर्त्यांच्या भरवश्यावरच ‘शत प्रतिशत’ भाजपाचा नारा दिला होता.  भाऊसाहेबांनी दिलेला हा नारा संपुर्ण राज्यातील कार्यकर्त्यांनी खरा करुन दाखविला असून राज्यात आज भारतीय जनता पाटीर्ची सरकार आहे.  येणा-या काळात भारतीय जनता पार्टी ने प्रत्येक बुथ वर बुथ प्रमुख नेमले आहेत.  हे बुथ प्रमुखच येणारी निवडणुक निवडून देणारे ठरणार आहे.  याचे प्रत्यक्ष उदाहरण आपण उत्तर प्रदेश मधील निवडणुक बघीतलीच आहे.  देशात तसेच राज्यात सुरु असलेले विविध विकास कामे व लोकहिताचे निर्णय होत आहेत. मागील चार वर्षात आपल्या सरकारने केलेली कामे व लोकहिताचे निर्णय जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम प्रत्येक कार्यकत्यार्ने करावे,  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  बैठकीला भाजपाचे जेष्ठ नेते ओंकारआप्पा तोडकर, चंदुसेठ मोहता, पदमाकर महाजन गुरुजी, चंद्रशेखर पुरोहित  ?जिल्हा सचीव, संजय शिनगारे शहराध्यक्ष, तसेच सर्व पदाधिकारी, न.प.सभापती, नगर सेवक नगर सेविका, सर्व आघाडयाचे अध्यक्ष, भाजपा, युवामोर्चा, महिला मोर्चा, विद्यार्थी आघाडी, सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Empowering Bhausaheb's 'hundred percent BJP' - MLA Akash Phundkar