शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांची पगारवाढ रोखली

By admin | Updated: April 6, 2015 02:06 IST

ग्रामपंचायतीची ९0 टक्के कर वसुली बंधनकारक; शासनाची अट अन्यायकारक!

सिद्धार्थ आराख /बुलडाणा: ९0 टक्के कर वसुली ज्यांनी केली नाही, अशा ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांची पगारवाढ रोखून त्यांच्या महागाई भत्त्यावरही राज्य शासनाने टाच आणली आहे. गत सहा महिन्यांपासून राज्यात ही परिस्थिती असून, यात विदर्भातील सुमारे २0 हजार कर्मचार्‍यांचा समावेश आहे. शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालयाने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना २0१३ पासून किमान वेतनवाढ करून निर्धारित केलेल्या वाढीव दरानुसार विशेष महागाई भत्ता लागू केला आहे; मात्र हा आदेश काढताना शासनाने कर्मचार्‍यांना किमान वेतन १00 टक्के अनुदानास पात्र होण्याकरिता ग्रामपंचायत कराची वसुली ही ८0 ते ९0 टक्के होणे गरजेचे आहे, अशी अट घातली होती. वास्तविक ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पगार देता यावेत म्हणून किमान वेतनाच्या अगोदर शासन ५0 टक्के अनुदान ग्रामपंचायतींना देत होते; मात्र एप्रिल २0१४ पासून शासनाने लोकसंख्येच्या परिमंडळ व आकृतीबंधातील कर्मचार्‍यांना किमान वेतनाच्या १00 टक्के अनुदान मंजूर करून यामध्ये वसुलीची अट कायम ठेवली. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीची वसुली ९0 टक्के आहे, त्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनाच किमान वेतनवाढ आणि महागाई भत्ता मिळत आहे; मात्र अशा ग्रामपंचायती फार कमी आहेत. उर्वरित ग्रा.पं. कर्मचार्‍यांना पगारवाढ मिळालेली नाही.