Eid-e-Milad celebrated with enthusiasm | ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी 
ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी 

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव: इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस  रविवारी बुलडाणा शहरासह खामगाव, नांदुरा, संग्रामपूरात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध संस्था संघटनांतर्फे दुपारनंतर मिरवणुका काढण्यात आल्या. मुस्लिम बांधवांमध्ये हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बांधवांनी दोन दिवसांपूर्वीपासूनच मिरवणुकीची तयारी केली होती. सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी विविध मौलानांसह इतर मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना  मार्गदर्शन केले. शहरातील विविध संस्थातर्फे ठिकठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. बुलडाण्यात अमन रथ द्वारे शांतिचा संदेश देत मुस्लिम बांधवानी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातुन जामा मस्जिद पर्यंत अमन रथ काढण्यात आला. या मिरवणुकीत शहरातील असंख्य मुस्लिम बांधव सामिल झाले होते. यावेळी मस्जिद मधील धर्मगुरु यांचा सन्मान करण्यात येऊन मिरवणुकीमध्ये सामिल करण्यात आले होते. बुलढाणा अर्बन संस्थे तर्फे मुस्लिम बांधवासाठी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Eid-e-Milad celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.