वाण काठावर कलिंगडाची वानवा
By Admin | Updated: May 12, 2014 22:36 IST2014-05-12T22:06:52+5:302014-05-12T22:36:52+5:30
वाण पात्रातील थड्यामधून मिळणार्या चवदार व थंडगार गर्दलाल रंगाच्या कलिंगडाची वाणवा आज वाण काठावरच जाणवत आहे.

वाण काठावर कलिंगडाची वानवा
वडगाव वाण : दहावर्षापूवी वाण पात्रातील थड्यामधून मिळणार्या चवदार व थंडगार गर्दलाल रंगाच्या कलिंगडाची वाणवा आज वाण काठावरच जाणवत आहे. वाण नदी वाहती असताना पावसाळी दिवसात नैसर्गिक रित्या मोठा पूर वाण नदीला राहत असे. या नदीत पात्रात सातपुड्यातील पडलेली मोठमोठी लाकडे वाहून येत असत. ही लाकडे पकडून त्यावर गुजराण करणारा भोई समाज मच्छीमारीचा पारंपारिक व्यवसाय करायचा. दिवाळी नंतर हाच समाज नदीपात्रात खरबूज, टरबूज वाड्या म्हणजे थडी करत असे. त्यामधून वांगी, टमाटे, ढेमसी, काकडी अशी पिके सुध्दा घेत होते. या पिकांना वाणचा मेवा म्हटल्या जायचे. आसपासच्या बाजारात वाण नदीतील मधून येणार्या मासोळ्या, खरबूज, टरबूज, काकडी, वांगी, ढेमसे, काकडी या सर्वांना मोठी मागणी असायची. मात्र,वारी हनुमान येथे पंधरा वर्षापूर्वी झालेल्या धरणामुळे वाण नदी वाहने विसरली व परिसराला अवकळा यायला लागली. जलपातळी कमालीची खोलवर गेल्याने सिंचन व्यवस्था कोलमडली. वाण पात्राची तर वाताहतच झाली आहे. वाण पात्राच्या भरवश्यावर गुजरान करणार्या भोई समाजाला सुध्दा पर्यायी व्यवस्था शोधावी लागत असल्याने व परंपरागत व्यवसाय हातचे गेल्याने त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. एकीकाळी सुजलाम सुफलाम असणारे वाणचे पात्र आज भकास असून त्यात गौणखनिजाच्या बेसुमार उपस्याने आणखीच भर पडली असून वाण मधून कलींगड नष्ट झाल्यासारखेच आहे.